ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन!

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन!

कुडाळ /-

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीने आज शनिवार २६ जून रोजी सकाळी ११ वा. कुडाळ प्रांत कार्यालयावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी दिली या आंदोलनामध्ये माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे सहभागी होणार आहेत असे त्यांनी सांगून या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळणार नाही या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला पुन्हा सुरुवात व्हावी यासाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर आरक्षणाच्या समर्थनार्थ चक्काजाम आंदोलन केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कुडाळ येथे हे आंदोलन केले जाणार आहे यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी सांगितले की यापुढे इतरही जातीच्या आरक्षणाला हे सरकार स्थगिती आणू शकते राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही स्थगिती मिळाली आहे सरकारच्या विरोधात आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे शनिवार २६ जून रोजी हे आंदोलन कुडाळ येथे केले जाणार असून भाजप कार्यालय ते तहसीलदार प्रांत कार्यालयापर्यंत हे आंदोलन केले जाणार आहे या आंदोलनामध्ये हजारो संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या आंदोलनाचे नेतृत्व खासदार नारायण राणे हे करणार असून यावेळी माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रांतिक सदस्य अतुल काळसेकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्हा तालुका व गावा स्तरावरील भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी केले आहे यावेळी माजी सभापती अॅड. विवेक मांडकुलकर, संतोष वालावलकर, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, जिल्हा पदाधिकारी बंड्या सावंत उपस्थित होते.

अभिप्राय द्या..