You are currently viewing कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे नव्याने ६६ रुग्ण सापडले,तर एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे नव्याने ६६ रुग्ण सापडले,तर एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ६६ रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे,ओरोस ९ , रानबांबूळी ८ ,भरणी १ ,आवळेगाव ४ ,कुडाळ १३ ,हळदीचे नेरूर १ ,माणगाव ५ ,पावशी १ ,हुमरस १ ,कासाल ७ ,आंबरड २ ,कुंदे ३ ,वाडीवरवडे १ ,सोनवडे १ ,पिंगुळी १ ,झाराप २ ,सरंबळ २-,वेताळ बांबर्डे २ ,नेरूर १ ,वर्दे १ असे कुडाळ तालुक्यात दिवसभरात ६६ कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर एकाचा मृत्यू झाला आहे.आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण २०९५,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १९३३ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १६२ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ७८२४ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ६७८८आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ८२३ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे,४६ आहेत.तर आज १ रुग्ण मृत्युमुखी झाला आहे.,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा