उपसरपंच यांना विमाकवच देण्याची पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही:-जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर

उपसरपंच यांना विमाकवच देण्याची पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही:-जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेने सरपंचांना विमा कवच जाहीर केले.परंतु उपसरपंच संघटनेवर अन्याय केला. उपसरपंच यांना सुध्दा जिल्हा परिषदेने विमा कवच व अन्य सुविधेचा लाभ देण्यात यावा. यासाठी आज वेंगुर्ले येथे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे उपसरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व मोचेमाड ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्रीकांत घाटे यांनी भेट घेऊन व्यथा मांडली यावेळी उपसरपंच सुध्दा गावातील एक मुख्य दुवा असुन कोरोनाच्या महामारीत तेवढ्याच बरोबरीने काम केले आहे.त्यामुळे त्यांना विमा कवच देण्या संदर्भात आपण प्रयत्नशील राहु अशी ग्वाही ना सामंत यांनी दिली.तर जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य व नियोजन सदस्य संजय पडते यांनीही बोलताना सांगितले की,सरपंचा प्रमाणे उपसरपंच सुध्दा ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा घटक आहे.कोरोना काळात उपसरपंचानीही चांगले काम केले आहे,व करत आहेत.तर सरपंच सुट्टीवर गेला तर उपसरपंच काम पाहतो.तसेच सरपंचांना जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून विमा कवच दिले आहे.आपणही स्थायी समितीच्या सभेत सरपंचा प्रमाणेचं उपसरपंचांनाही विमा कवच व अन्य सुविधेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री.पडते यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..