नारायण राणे यांनी दोडामार्ग तालुका करत इमारत देखील उभारली, पण त्यांच्या नावाची पाठी मात्र एका बाजूला जंगलमय परिस्थितीत दुरावस्थेत आढळते.

नारायण राणे यांनी दोडामार्ग तालुका करत इमारत देखील उभारली, पण त्यांच्या नावाची पाठी मात्र एका बाजूला जंगलमय परिस्थितीत दुरावस्थेत आढळते.

दोडामार्ग /-

दोडामार्गच्या भाग्यविधात्यावर दोडामार्ग वासीयांचे दुर्लक्ष…

मुळातच दोडामार्ग तालुका महाराष्ट्र राज्याच्या एका टोकाला व गोवा राज्या च्या अगदी जवळ असून गोवा राज्याशी मैत्रीचे संबंध दर्शवणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो त्यातच १९९९साली मा. नारायण राणे यांच्या अथांग प्रयत्नातून तालुका घोषित करण्यात आला परंतु हा तालुका घोषित करण्या अगोदर हाच तालुका दोडामार्ग येथे नकरता भोम येथे करण्याचे शासनाने योजिले असता नारायण राणे यांनी याला विरोध करत तो तालुका दोडामार्ग येथे करण्याचे योजिले व ते पूर्ण देखील केले, या अगोदर दोडामार्ग वासीयांना सावंतवाडी तालुका होता व सावंतवाडी हा तालुका दोडामार्ग पासून चाळीस किलोमीटर असून तो दोडामार्ग मधील अन्य गावांसाठी तो भरपूरच लांब असल्याने व त्यातच वाहनांची सोय उपलब्ध नसल्याने दोडामार्ग वासीयांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे खूप कठीण होते व आपल्या कामांची पूर्तता करणे अशक्य होते, एखाद्या कामासाठी कामा अभावी अवाढव्य रक्कम खर्च करावी लागत असून दोन दिवसांचा कालावधी देखील लागत होता, यामुळे येथील वासीयांना शासकीय काम करणे म्हणजे अनेक खर्चीक बाब मानली जायची आणि यामुळे येथील लोकांची कामे मात्र कायम अपुरी असत व त्यातच शासकीय योजनांचा लाभ देखील दोडामार्ग वासीयांना मिळत नसे अशा अनेक समस्या लक्षात घेता व दोडामार्ग वासीयांनची परवड पाहता नारायण राणे यांनी आपला स्वप्नातील तालुका घोषित करत आपण मात्र तो तालुका करणारच हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवत दुर्गम दोडामार्गला १९९९ साली तालुका घोषित केले असता आपण महसूलमंत्री असताना दोडामार्ग वासीयांसाठी तहसीलदार कार्यालयाची प्रशासकीय इमारत शासकीय भूखंडावर बुधवार दिनांक १५ ऑगस्ट २००७ साली दुपारी १२.०० वाजता मा. श्री. महसूलमंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नारायण राणे यांनी आपल्या शुभहस्ते प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन देखील केले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते,सावंतवाडी विधानसभा आमदार शिवराम दळवी, अप्पर मुख्य सचिव (महसूल) मा. श्रीमती निला सत्यनारायण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी, अधीक्षक अभियंता बांधकाम मंडळ रत्नागिरी व मा. सौ. विजयलक्ष्मी बिदरी-प्रसंन्ना जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग हे देखील उपस्थित होते, नारायण राणे यांच्या अथांग प्रयत्नातून हे शक्य झाले असता यामुळे नारायण राणे यांना दोडामार्गचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाते,
परंतु या सर्व कार्याचा नक्की विसर कुणाला पडला नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांना की प्रशासकीय अधिकारी वर्गाला की संपूर्ण दोडामार्ग तालुका वासीयांना हे मात्र समजणे अशक्य झाले आहे ते म्हणजे दोडामार्ग मधील तहसीलदार कार्यालया बाहेर एका बाजूला असलेल्या नारायण राणे यांच्या नावाच्या पाठी वरून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश प्रशासकीय इमारत उभारण्यास नारायण राणे यांचे मोठे योगदान असल्याने नारायण राणे यांच्या नावाची पाठी ही इमारती मध्ये इमारतीच्या सुरवातीलाच लावली आहे परंतु दोडामार्ग मधील तहसीलदार कार्यालयातील नारायण राणे यांच्या नावाची पाठी मात्र इमारती बाहेर एका बाजूला कोपऱ्यात गवताळ भागात वाढलेल्या एका झाळीत जंगलमय परिस्थितीत आढळून येते यावर मात्र शासकीय अधिकारी देखील हातावर हात ठेवत गप्प असून नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांन मध्ये देखील या बद्दल कोणत्याही प्रकारची चळवळ दिसत नाही तर दोडामार्ग वासी देखील याबद्दल प्रयत्नशील नसल्याने दोडामार्गच्या भाग्यविधात्यालाच दोडामार्ग मध्ये स्थान नसल्याचे चित्र मात्र समोर येताना दिसत आहे, यामुळे नारायण राणे यांच्या कार्याचा दोडामार्ग वासीयांना विसर पडला की काय असा प्रश्न देखील उपस्थित होताना दिसत आहे.

अभिप्राय द्या..