विशाल हांगे आत्महत्याप्रकरण आरोपी सुभाष लाड यानी सरपंच पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा- शिवसेना उपविभाग प्रमुख अॅड. भाऊ चव्हण..

विशाल हांगे आत्महत्याप्रकरण आरोपी सुभाष लाड यानी सरपंच पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा- शिवसेना उपविभाग प्रमुख अॅड. भाऊ चव्हण..

मालवण /-

मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे गावचे कृषी सहाय्यक विशाल हांगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 7 संशयित आरोपींन मध्ये गोळवण कुमामे डिकवल गावचे सरपंच सुभाष लाड यांचे नाव आहे. ही गोष्ट गावच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. गावच्या प्रथम नागरिकांचे नाव अशा गुन्ह्यात यावे ही बाब आपल्या गावची प्रतिमा मालिन करण्यासारखी आहे. त्यामुळे सुभाष लाड यानी आपली नैतिक जबाबदारी ओळखत आपल्या सरपंच पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. व पोलिस प्रशासन व न्याय व्यवस्था याना सहकार्य करावे. अशी मागणी गोळवण गावचे शिवसेना उपविभागप्रमुख अॅड भाऊ चव्हाण, शिवसेना शाखा गोळवण यांच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
सुभाष लाड यांनी त्यांच्यावरील जे आरोप व गुन्हे दाखल आहेत त्या मधून त्यांची निर्दोष मुक्तता होत नाही तो पर्यन्त सरपंच पदापासून दूर राहून न्याय प्रक्रीयेचा सन्मान करावा तसेच न्याय प्रक्रीया चालू असताना सरपंच पदाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर राहून योग्य न्यायाची वाट पहावी. अशी मागणी शिवसेना शाखा गोळवण यांच्या कडून करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..