भिरवंडे येथील मंगेश सावंत यांचे रेल्वे अपघातात निधन..

भिरवंडे येथील मंगेश सावंत यांचे रेल्वे अपघातात निधन..

कणकवली /-


भिरवंडे बिवणे वाडीतील टेंबकर घराण्यातील मंगेश बाळकृष्ण सावंत यांचे मुंबई (ठाणे) येथे काल 24 जून रोजी दुपारी 1 वाजता रेल्वे अपघातात दुखःद निधन झाले.मुंबई येथील नामांकित लिफ्ट कंपनी (SHINDLER) येथे मॅनेजर पदावर कार्यरत असताना त्यांनी गावातील तरूण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले. गावातील सर्व सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व इतर सर्व कार्यक्रमात त्यांचा उत्स्फुर्त सहभाग असायचा. त्यांच्या कार्यामुळे तरुणांचा आधारवड म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या अशा अचानक जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. शिवसैनिक प्रताप पांडुरंग सावंत यांचे ते पुतणे, राणे समर्थक अरूण भगवान सावंत व शासकीय ठेकेदार व शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत सावंत यांचे ते सख्खे चुलत भाऊ होत. तसेच पत्रकार संजोग सावंत यांचे ते चुलत भाऊ होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, दोन विवाहित बहिणी, दोन काका, काकी, भावंडे असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..