राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रा.वैभव खानोलकर प्रथम..

वेंगुर्ला /-


उत्तुंग फाऊंडेशन आणि कलाकुंर मंडळ रायगड आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त महाराष्ट्र आणि गोवा या राज्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.’स्त्री मला कधीतरी समजेल का?’ या विषयावर आधारित
या स्पर्धेला दोन्ही राज्यांतून उदंड प्रतिसाद मिळाला.यात नेमळे पंचक्रोशी विद्यायलाच्या प्रा.वैभव खानोलकर यांनी बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला.प्रा.खानोलकर यांचा या यशाबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ सर ,प्राचार्या बोवलेकर यांनी विशेष अभिनंदन केले.झुम अँप च्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न झाली असुन या स्पर्धेतील विजेते असणारे प्रा.खानोलकर यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि पुस्तके अशा स्वरुपाचे बक्षिस देऊन गौरव केला जाणार आहे.प्रा.खानोलकर यांनी अनेक राज्यस्तरीय,निबंधलेखन,काव्यलेखन,वक्तृत्व,शोधनिंबध आदी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविले असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थीही राज्यस्तरावर उत्तुंग यश मिळवित आहेत.
या यशाबद्दल विविध स्तरातून खानोलकर यांचे अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..