तारकर्ली ग्रामस्थ ग्राहक लाईट मुळे हैराण ठिया आंदोलन इशारा..

तारकर्ली ग्रामस्थ ग्राहक लाईट मुळे हैराण ठिया आंदोलन इशारा..

मालवण /-


मालवण तालुक्यातील तारकर्ली गावी तोक्ते वादळात आठ दिवस पूर्ण गाव अंधारात राहून काळोखाचे चटके प्रत्येक गावातील कुटुंबांनी पाहिले.त्यावेळी कोणीही पुढे आले नाही.तर गावातील काही ठराविक मुलं एकत्र येऊन वादळात पडलेले फोल ,तुटलेले तारा उभे करण्याकरिता त्यांच्याच कंत्राटी तरुण कामगारां सोबत खांद्याला खांधा लाऊन या गावाच्या लाईनमन श्री. आंबेरकर सोबत घेऊन फोल उभे व लाईन सोडण्यासाठी मदत काम केले .त्यावेळी या गावातील लाईट हळू हळू चालू झाली .पण लाईट असून नसल्यासारखी लोकांना वाटते.बिल मात्र भरमसाठ येतात आणि ती भरण्याकरिता मात्र तगादा असतो .
परंतु लाईट चालू झाली पण ती असूनही नसल्यासारखी सर्वाँना आजनितीज वाटत आहे.याचे कारण दिवस रात्र लाईट जाण्याला अंत नाही.लाईट ये _जा करीत असल्याने काहींचे विद्युत उपकरणे खर्चिकला आली व येत आहेत.याला जबाबदार मालवण महावितरणचे संबधित अधिकारी आहेत काय? या गावातील संपूर्ण लाईन जीर्ण झाले त्याकडेही कोणाचा लक्ष नसून दुर्लक्ष जाणून बुजून करीत आहेत.याविभागाच्या असिस्टड इंजिनियर मॅडम यांना विचारणा केली तर काम चालू आहे.फॉल्ट आहे म्हणजे आज महिनाभर लाईटचा फॉल्टच यांना भेटत नाही .नागरिकांनी मात्र त्रास वारोंवार सहन करावा.हे आरामात मजेत रहातात. मग यांना काय की इतरांना काय बोलावे हेच ग्रामस्थ विचारात आहेत .लाईटचा खेळ खंडोबा हा एकादे वायरमन त्या स्ट्रानस्फार्मर जवळ बसूनच आहेत .लाईट जाते काय एक मिनिटात वापस लाईट येते काय . लाईट जाण्याने तारकर्ली ग्रामस्थ ग्राहक इतके हैराण झाले आहेत की नक्की काय करावे या विवंचनेत असताना येत्या पंधरा दिवसात लाईटचां खेळ खंडोबा थांबला नाही तर तारकर्ली नागरिक मालवण कार्यालयात कोविड १९ चे नियम पाळून ठीया आंदोलन करतील हा अंतिम निर्णय ग्रामस्थांनी घेतला याची पूर्ण कल्पना आपणांस देत आहोत.असे तारकर्ली ग्रामस्थांच्यावतीने तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अभिप्राय द्या..