You are currently viewing महाराष्ट्राला कोरोनापासून सुरक्षित करायचे तर सुरुवात सिंधुदुर्ग मधून करुया.;आ.शैलार यांच्या कडून आचरा चिंदर येथे<br>मास्क,आँक्सिमिटरचे वाटप

महाराष्ट्राला कोरोनापासून सुरक्षित करायचे तर सुरुवात सिंधुदुर्ग मधून करुया.;आ.शैलार यांच्या कडून आचरा चिंदर येथे
मास्क,आँक्सिमिटरचे वाटप

आचरा /-

आचरा. अर्जुन बापर्डेकर

कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.कोरोना पासून महाराष्ट्राला सुरक्षित करण्यासाठी सुरुवात सिंधुदुर्ग मधून कोरोनाचा बिमोड करून करूया असे आवाहन माजी शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांनी आचरा येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हयाच्या भेटीवर आलेल्या आ.आशिष शेलार यांनी चिंदर,आचरा येथील कोविड सेंटरला भेट देऊन ग्रामपंचायतींना आँक्सिमिटर आणि मास्क चे वाटप केले.
यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे अतुल काळसेकर, अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, आचरा सरपंच प्रणया टेमकर, महेश मांजरेकर, प्रकाश मेस्त्री,जयप्रकाश परुळेकर, दत्ता वराडकर,उदय घाडी,आचरा उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर,लवू घाडी,व्रूषाली आचरेकर यांसह अन्य भाजप कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप तर्फे कोविड सेंटर मधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

अभिप्राय द्या..