वेंगुर्ले शहरातील नातूव्हाळीबाबत काँग्रेस नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..

वेंगुर्ले शहरातील नातूव्हाळीबाबत काँग्रेस नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..

वेंगुर्ले /-


वेंगुर्ले शहरातील नातूव्हाळी मधील सांडपाणी वाहून नेणे व 15 KLD ची STP यंत्रणा पूर्ण कार्यान्वित झाल्याशिवाय सदर दोन्ही कामांचे रनिंग बिल अदा करण्यात येऊ नये,अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी मुख्याधिकारी नगरपरिषद वेंगुर्ले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे शहरातील नातूव्हाळी मधील सांडपाणी वाहून नेणे व 15 KLD ची STP यंत्रणा बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.सदर प्रकल्प हा शहरासाठी पथदर्शी प्रकल्प असल्याने सदर प्रकल्प पूर्ण झाल्यावर संबंधित यंत्रणा पूर्ण कार्यान्वित करुन त्याची उपलब्धता पडताळून मगच सदर दोन्ही कामांची देयके अदा करण्यात यावीत.याआधी वेंगुर्ले शहरात भुयारी गटार ही पथदर्शी योजना असेच रनिंग बिल अदा करुन गुंडाळण्यात आली,असे म्हटले आहे. तरी वरील दोन्ही कामांचे रनिंग बिल अदा करण्यात येऊ नये,अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी गटनेते प्रकाश डिचोलकर,नगरसेवक विधाता सावंत,कृतिका कुबल,दादा सोकटे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..