You are currently viewing जिल्हा परिषदेला सरपंच दिसतात पण उपसरपंच काम करतात त्यांना विमा कवच कानाही?उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष आबा खवणेकर यांचा सवाल..

जिल्हा परिषदेला सरपंच दिसतात पण उपसरपंच काम करतात त्यांना विमा कवच कानाही?उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष आबा खवणेकर यांचा सवाल..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेने नुकतेच सरपंच संघटनेच्या मागणी वरुन विमा कवच दिले मात्र उपसरपंच सुध्दा तेवढेच काम करतात मग दुजाभाव का? असा सवाल उपसरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार आबा खवणेकर यांनी केला आहे.या वेळी बोलताना उपसरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर म्हणाले की, कोरोना काळात ग्रामनियंत्रण समिती कार्यरत असते,त्यामध्ये सरपंच, उपसरपंच,सदस्य,तलाठी, ग्रामसेवक,आरोग्य सेवक,तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस पाटील असे लोक कार्यरत असताना फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेने फक्त सरपंच यांनाच विमा कवच देऊन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उपसरपंच यांच्यावर अन्याय केला आहे.असे सांगुन श्री. खवणेकर म्हणाले उपसरपंच यांनाही विमा कवच मिळाले पाहिजे न पेक्षा उपसरपंच संघटनेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा गंभीर इशाराचं श्री. खवणेकर यांनी दिला.

तसेच येत्या चार दिवसांत याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद अध्यक्ष,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत उपसरपंच संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचेही श्री.खवणेकर यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..