You are currently viewing आकेरी येथील ट्रकला मोटरसायकल अपघातात मोटारसायकलस्वारासह महिला,लहान मुलगी जखमी.; मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल…

आकेरी येथील ट्रकला मोटरसायकल अपघातात मोटारसायकलस्वारासह महिला,लहान मुलगी जखमी.; मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल…

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे कर्नाटक वरून येणाऱ्या ट्रकच्या मागील चाकावर मोटरसायकल धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार नागेश जयराम कुडाळकर (रा. झाराप कुंभारवाडी) याच्यासह त्याची पत्नी व छोटी मुली जखमी झाली या तिघांनाही गोवा- बांबोळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोटर सायकल स्वार नागेश कुडाळकर यांच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ट्रकचालक गणेश पवार यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रक चालक हे आपल्या ताब्यातील ट्रक नंबर केए २७ बी ८५८५ हा ट्रक कर्नाटक ते कुडाळ असा घेऊन येत होते आकेरी येथे आल्यावर वसंत भगत यांच्या घरासमोरील वळणावर झाराप ते सावंतवाडी जाणाऱ्या मोटर सायकल नंबर एमएच ०७ झेड ६६९३ मोटर सायकलस्वार नागेश कुडाळकर व त्यांच्यासोबत त्यांची पत्नी निकिता व मुली वेदा या दोघी या मोटरसायकलवर होत्या दरम्यान ते आकेरी येथे आल्यावर या वळणावर त्यांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज आला नाही आणि ट्रक मागील चाकाखाली ही मोटरसायकलची धडक दिली या अपघातात नागेश कुडाळकर यांच्यासह त्यांची पत्नी निकिता व मुली वेदा जखमी झाली या तिघांनाही उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी पोलिस ठाण्याचे पोलिस शिंगाडे हे दाखल झाले त्यांनी या अपघाताचा पंचनामा केला. दरम्यान अपघात प्रकरणी या मोटरसायकलस्वार नागेश कुडाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..