कुडाळ तालुक्यात २३/२४ जूनला या दोन दिवसात कोरोनाचे १३७ रुग्ण सापडले..

कुडाळ तालुक्यात २३/२४ जूनला या दोन दिवसात कोरोनाचे १३७ रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात २३ जून २४ जून या दोन दिवसात कोरोनाची १३७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.त्यात २४ जूनला ५७ कोरोना रुग्ण सापडले तर २३जूनला ८० कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर या दोन दिवसात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.सापडलेल्या रुग्णांचे प्रमाण हे ग्रामीण भागतील जास्त दिसून येत आहे तर कुडाळच्या शहरी भागात कमी प्रमाण दिसत आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण २०७५,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १९१५ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १६० कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ७७५८ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ६६८१ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ८६६ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे,४६ आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..