दहशतवादी प्रवृत्तीविरोधात आगामी सर्व निवडणूका जिंकणे हिच श्रीधर नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेल.;पालकमंत्री उदय सामंत..

दहशतवादी प्रवृत्तीविरोधात आगामी सर्व निवडणूका जिंकणे हिच श्रीधर नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेल.;पालकमंत्री उदय सामंत..

कै. श्रीधरराव नाईक यांचा ३० वा स्मृतिदिन कणकवलीत साजरा..

कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात २२ जून हा काळा दिवस आहे. या दिवशी जिल्ह्यातील दहशतीमुळे श्रीधर नाईक यांची राजकीय हत्या झाली.राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे हे नेते होते.दहशती विरोधात लढण्यासाठी कोणी अंगावर आला तर शिंगावर घेण्याचा पायंडा त्यांनी जिल्ह्यात पाडुन दिला आहे. कार्यकर्त्यांना अनेक आदर्श त्यांनी घालून दिले ते आदर्श घेऊन सर्वांनी काम करूया. दहशतवादी प्रवृत्ती सिंधुदुर्गातून हद्दपार झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होऊन या प्रवृत्तीविरोधात लढलं पाहिजे. कणकवली विधानसभेतील उमेदवार निवडून आणण्याची आज शपथ घेऊ. श्रीधर नाईक यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकाव्या लागतील. त्याचबरोबर श्रीधर नाईक यांचे उरलेले विकासाचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प आजच्या दिवशी करून ती जबाबदारी आपण स्विकारत असल्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले.

कै. श्रीधरराव नाईक यांचा ३० वा स्मृतिदिन कणकवलीत खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, ब्रिगेडियर सुधीर सावंत, गौरीशंकर खोत यांच्याप्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्व. श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. यानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. तसेच कै. श्रीधर नाईक उद्यान नूतनीकरण कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आहे.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,शिवसेना नेते संदेश पारकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, विकास सावंत, काका कुडाळकर, अतुल रावराणे, विकास कुडाळकर, जि प सदस्य संजय आंग्रे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,बाळा भिसे, भास्कर राणे,तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, अबीद नाईक,राजू राणे, शेखर राणे, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, सतीश नाईक, संकेत नाईक,प्रसाद रेगे, मुरलीधर नाईक, महेंद्र नाईक, विलास कोरगावकर, अनंत पिळणकार, अवधूत मालणकर, रामू विखाळे , भूषण परुळेकर, रूपेश आमडोस्कर हर्षद गावडे महेंद्र सावंत साईनाथ चव्हाण, बबली राणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,माधवी दळवी, अल्का राणे,प्रतीक्षा साटम,वैद्येही गुडेकर,पूजा घाडीगावकर,जेष्ठ स्नेही आबा उचले, विजय कोदे ,सुनील नाडकर्णी, विजय पारकर, प्रवीण पारकर, बाबू सावंत, डॉ. तुळशीदास रावराणे, बाळू मेस्त्री, पालेकर गुरुजी, मारुती सावंत, गणेश राणे, हरिभाऊ भिसे, आबा दुखंडे, मामा राऊळ, हनीफ पिरखान, महेश कोदे, भाई कांबळी आदींसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व श्रीधर नाईक प्रेमी उपस्थित होते.

खासदार विनायक राऊत म्हणाले, काही समाजकंठकांनी श्रीधर नाईक यांची हत्त्या करून जिल्ह्यात दहशत माजविली, त्यामुळे जिल्ह्याचे नाव बदनाम झाले. मात्र जिल्हयातील जनतेने या अपप्रवृत्ती विरोधात लढा देऊन जिल्ह्यातील दहशत हटविण्याचे काम केले. त्यामुळे जिल्ह्यात आता शांतता पसरली आहे. श्रीधर नाईक यांचे बलिदान व्यर्थ गेलेले नाही. त्यांच्या बलिदानातून अपप्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी आमच्या सारखे अनेक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते निर्माण झाले.त्यांचा समाजसेवेचा आदर्श घेऊन आपण काम करू तसेच अनाथांना आधार देण्यासाठी श्रीधर नाईक यांच्या नावाने एक ट्रस्ट सुरु करण्याचे आवाहन त्यांनी श्रीधर नाईक प्रेमींना केले.

आमदार वैभव नाईक म्हणाले, कै. श्रीधर नाईक यांची हत्या आम्हा कुटुंबियांच्या मनाला चटका लावणारीच होती.त्यांचे विचार नवीन पिढीला आत्मसात व्हावेत यासाठी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त…

अभिप्राय द्या..