वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्सेनिक गोळ्या संपूर्ण शहरांत वाटपाचा शुभारंभ

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्सेनिक गोळ्या संपूर्ण शहरांत वाटपाचा शुभारंभ

वेंगुर्ले
वेंगुर्ले शहरातील सर्व कुटुंबांना वाढत्या कोरोना विषाणूंच्या फैलावापासून रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक व प्रतिकार शक्ती वाढविणासाठी होमिओपॅथिकचे औषध अर्सेनिक अल्बम-30 च्या गोळ्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ वॉर्ड क्र. 14 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला सचिव सौ. नम्रता कुबल यांच्या हस्ते करण्यांत आला. वेंगुर्ले शहरातील सर्व 17 हि वॉर्डमधील सर्व नागरीकांना या अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यांत येणार असल्याचे सौ. कुबल यांनी स्पष्ट केले
या प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यात वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्त्यवान साटेलकर, जिल्हा सदस्य नितीन कुबल, शहर उपाध्यक्ष वामन कांबळे, महिला शहर अध्यक्ष सुप्रिया परब, शिवाजी गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..