वैभववाडी-तरळे महामार्गावर कलंडलित आकेशियाचे झाड.;महामार्गावरील वाहतुकीस अडथळा..

वैभववाडी-तरळे महामार्गावर कलंडलित आकेशियाचे झाड.;महामार्गावरील वाहतुकीस अडथळा..

वैभववाडी /-

गेल्या दोन दिवसांपासून वैभववाडी तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. काल सायंकाळ नंतर पावसाच्या सरींसह वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वैभववाडी- तरळे महामार्गावर कोकीसरे घंगाळेवाडी येथे मोठे आकेशीयाचे झाड महामार्गावर कलंडले आहे. झाड कलंडलेल्या ठिकाणी थोड्याच अंतरावर असणारे तिव्र वळण व रस्त्याबाजूचा सखलाचा भाग यामुळे वैभववाडीकडे येणाऱ्या प्रवाशांना वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी लागत आहे. संबंधित विभागाने या गोष्टीची दखल घेऊन झाड त्वरित हटवावे अशी मागणी प्रवाशांकडून होतं आहे.

अभिप्राय द्या..