You are currently viewing कुडाळ एसटी स्टँड वरील खड्डे न बुजवल्यास खड्ड्यात भात लावणी करणार मनसेचे बनी नाडकर्णी यांचा ईशारा..

कुडाळ एसटी स्टँड वरील खड्डे न बुजवल्यास खड्ड्यात भात लावणी करणार मनसेचे बनी नाडकर्णी यांचा ईशारा..

कुडाळ /-

कुडाळ एसटी स्टँड परिसरामध्ये खड्डे जर बुजवले नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना त्या चिखलात भात शेती करणार करणार असल्याचा इशारा बनी नाडकर्णी यांनी दिला आहे.
सध्याच्या पावसाळी मोसमात कुडाळ एसटी स्टँड चे काम अपुरे राहिल्यामुळे, संपूर्ण स्टॅन्ड चे परिसर चिखलमय झालेले असून त्याकडे एस टी प्रशासनाचा लक्ष नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत व अशा परिस्थितीमध्ये दहा दिवसाच्या आत प्रशासनाने योग्य ती पावले उचलली नाही तर त्या चिखलात महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना भात पेरणी व भात लावणी करणार असल्याचा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी आज कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना ईशारा दिला आहे.

अभिप्राय द्या..