You are currently viewing एच.आय.व्ही.बाधित ५० रुग्णांना कोरोना लसीकरण शिबीर संपन्न..

एच.आय.व्ही.बाधित ५० रुग्णांना कोरोना लसीकरण शिबीर संपन्न..

सिंधुदुर्गनगरी /-


जिल्ह्यातील एचआयव्ही बाधीत रुग्णांसाठो आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबारामध्ये 50 रुग्णांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला यात 45 वर्षाखालील 22 रुग्णांना विशेब बाब म्हणून तर 45 वर्षावरील 28 रुग्णांना कोरोना लस देण्यात आली
प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांच्या विशेष सहकार्याने आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा ए.आर.टी. सेंटर अंतर्गत एचआयव्ही बाधीत रुग्णांकरिता कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी करण्यात आले होते .या शिबिरात एकूण 50 पात्र रुग्णांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. रुग्णांकडून विहित नमुन्यात
ना- हरकत समंती पत्र लिहून घेण्यात आले. लसीकरण झालेल्या रुग्णांना प्रमाणपत्र देण्यात आले.18 ते 44 वयोगटातील 22 तर 45 वर्षावरील 28 रुग्णांनी लसीचा लाभ घेतला
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर सिंधुदुर्ग ए.आर.टी. सेंटर च्या अधिकारी व कर्मचारी याच्या मदतीने यशस्वीपणे संपन्न झाले.शिबिराच्या आयोजनात जिल्हा पर्यवेक्षक सुनील ढोनूकसे व डेटा मॅनेजर रश्मी गावडे , अधिपरिचरिका गायत्री नाईक, समुपदेशक महानंदा पाटील, प्रसन्न कामत,अमित कांबळे,अमोल पालव, मानसिंग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.एच आयव्ही बाधीत रुग्ण 45 वर्षाखालील असतानाही विशेष बाब म्हणून कोरोना लसीकरण शिबीरास घेण्यासाठी डॉ पाटील व यांचे मार्गदर्शन व डॉ कांबळे याचे सहकार्य लाभले.

अभिप्राय द्या..