You are currently viewing कणकवली बाजारपेठेत १७ जूनपासून आरटीपीसीआर टेस्ट.;प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला निर्णय..

कणकवली बाजारपेठेत १७ जूनपासून आरटीपीसीआर टेस्ट.;प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला निर्णय..

कणकवली /-

कणकवली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह कणकवली शहरात ज्या ठिकाणी 10 किंवा त्यापेक्षा जास्त सक्रिय कोव्हीड रुग्ण आहेत अशा भागात उद्या 17 जूनपासून आरटीपीसीआर टेस्ट सुरू करण्याचा निर्णय प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, तहसीलदार रमेश पवार, पोलीस निरीक्षक मुल्ला, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ शिकलगार, न. पं. चे नगरसेवक, न. पं. कर्मचारी उपस्थित होते. कणकवली बाजारपेठेत सध्या सक्रिय रुग्ण संख्या जास्त आहे. त्यामुळे सोमवार 14 जूनपासून कणकवली शहर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याला राजकीय हस्तक्षेपामुळे ब्रेक लागला होता. अखेर आज प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उद्या 17 जूनपासून व्यापाऱ्यांसह शहरात आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अभिप्राय द्या..