कुडाळमद्धे राष्ट्रवादीकाँग्रेस कडून विद्युतकर्मचाऱ्यांचे केले सत्कार..

कुडाळमद्धे राष्ट्रवादीकाँग्रेस कडून विद्युतकर्मचाऱ्यांचे केले सत्कार..

कुडाळ /-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आज येथील वीज अभियंता व वीज कर्मचारी यांनी तौक्ते चक्रीवादळाचा सामना करीत कुडाळ शहरात अवघ्या एक ते दीड दिवसात वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा येथील वीज वितरण कार्यालयात झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16 मेस तौक्ते चक्रीवादळ व मुसळधार पाऊस सुरू होता तब्बल 20 ते 22 तास हे चक्रीवादळ सुरू असताना पाऊस थांबला नव्हता अशावेळी जिल्ह्यातील बरीच गावे गेली दहा ते बारा दिवस अंधारात खितपत पडली होती दरम्यान कुडाळ शहरात वीज वितरणचे सहायक अभियंता सुमित पाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वीज कर्मचारी अरुण मांजरेकर, अंकुश चव्हाण, विवेक हुले,विनायक भोई,दाजी कुंभार, श्रीराम कुभार,आबा परब सर्वेश साबळे संदेश वराडकर आत्माराम परब श्रीराम कुंभार आदींनी नागरिकांच्या सहकार्याने चक्रीवादळ व पाऊस कोसळत असताना सुद्धा कुडाळचा वीजपुरवठा अवघ्या एक ते दोन दिवसात सुरळीत केला ठीकठिकाणी विजेच्या तारा कोसळल्या होत्या अशावेळी ही सेवा तात्काळ सुरू करून दिल्याबद्दल त्यांच्या सेवेचा गौरव राष्ट्रवादी काँग्रेस कुडाळच्यावतीने पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी सभापती सुनिल भोगटे यांच्या नियोजनाखाली जिल्हा अध्यक्ष अमित सामंत महाराष्ट्र राज्य संघटक सचिव काका कुडाळकर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी युवक राष्ट्रवादी काँ. कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावसकर, जिल्हा सरचिटणीस ॲड. हितेश कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाताडे, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत, कुडाळ उप शहराध्यक्ष प्रकाश वेंगुर्लेकर, शहर सरचिटणीस केदार भोसले उपस्थित होते सहाय्यक अभियंता सुमित पाध्ये स्वप्नाली थोरात यांच्यासह वीज कर्मचारी अंकुश चव्हाण, विवेक हुले,विनायक भोई,दाजी कुंभार, श्रीराम कुभार,आबा परब सर्वेश साबळे संदेश वराडकर आत्माराम परब दाजी कुंभार, या सत्कार मूर्तीना भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले श्री सुनिल भोगटे म्हणाले अतिशय कठीण परिस्थितीत अवघ्या एका दिवसात वादळ व पाऊस यांच्याशी संघर्ष करत वीज वितरण कुडाळच्या टीमने वीज सेवा सुरळीत सुरू केली त्यांचे कौतुक करण्यासाठी आमच्याकडे शब्द नसल्याचे सांगितले सहायक अभियंता श्री पाध्ये यांनी विजग्राहक हे आमचे दैवत आहे त्यांची प्राधान्याने सेवा करणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे सर्व वीज कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी आम्हाला फार मोठे सहकार्य केले त्यामुळेच आम्ही ही लवकर सेवा दिली तुम्ही केलेला आमचा गौरव हा आमच्या सर्व वीज कर्मचाऱ्यांचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अभिप्राय द्या..