पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयकुडाळच्या परिसरामध्ये वृक्षारोपण..

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयकुडाळच्या परिसरामध्ये वृक्षारोपण..

कुडाळ /-

. कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये महिला महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाच्या वतीने नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे याच दिवशी संस्थेचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर यांचाही वाढदिवस होता. या दोन दिवसाचे औचित्य साधून महिला महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे चेअरमन व विविध अभ्यासक्रमाचे प्राध्यापक, कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, नर्सिंग महाविद्यालयाच्या उप प्राचार्य कल्पना भंडारी ,बी .एड., महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य धावडे, एन.एस. एस. कार्यक्रम अधिकारी तृप्ती नाईक, एच. आर. ओ. पियुषा प्रभू तेंडोलकर, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिग्रस सेक्रेटरी भुपत सावंत व विद्यार्थी व विविध कर्मचारी सोशल डिस्टन्स सर्व नियम पाळून सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

अभिप्राय द्या..