विश्व हिंदु परिषदेकडून वेंगुर्ले नगरपरिषदेला पीपीई कीट व मास्क प्रदान..

विश्व हिंदु परिषदेकडून वेंगुर्ले नगरपरिषदेला पीपीई कीट व मास्क प्रदान..

वेंगुर्ला /-


विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्लेच्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषदेस ६० पीपीई कीट व ५० मास्क नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व मुख्याधिकारी डाॅ. अमितकुमार सोंडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.डाॅ. दिलीप पवार , शास्त्रज्ञ (मुंबई) व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही पीपीई कीट व मास्क देण्यात आले.यापूर्वी सुद्धा विहिपतर्फे वेंगुर्ले नगरपरिषदेला पीपीई कीट, मास्क व ऑक्सिमीटर देण्यात आले होते.वेंगुर्ले नगरपरिषदेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विश्व हिंदु परिषदेचे कोकण विभागाचे प्रकल्प प्रमुख डाॅ. राजन शिरसाठ, वेंगुर्ले प्रखंडाचे अध्यक्ष अरुण गोगटे,सह मंत्री महेश वेंगुर्लेकर , महेश सावळ,दिलीप मुळीक, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, भाजपा वेंंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल आदी उपस्थित होते.कोव्हिड काळात वेंगुर्ले नगरपरिषदेला अजून काही मदत हवी असल्यास विश्व हिंदु परिषदेतर्फे दिली जाईल असे डाॅ. राजन शिरसाठ यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..