तुळस गावात घरोघरी शोषखड्डयांचा शुभारंभ..

तुळस गावात घरोघरी शोषखड्डयांचा शुभारंभ..

वेंगुर्ला /-


केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाला प्रतिसाद देत तुळस गावात घरोघरी शोषखड्डयांचा शुभारंभ तुळस ग्रामपंचायत सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपसरपंच सुशिल परब,ग्रामसेवक तुषार हळदणकर,ग्रा.पं.सदस्य जयवंत तुळसकर,चंद्रे परब,तेजस्वी ठुंबरे,पं.स.चे सहाय्यक कार्य.अधि.रोजगार हमी योजना विवेक तिरोडकर,वेंगुर्ले पं.स.च्या कृषी तांत्रिक सहाय्यक सुप्रिया सावंत,ग्रामरोजगार सेवक आप्पा परब,दिनानाथ साळगावकर,समीर तांबोसकर आदी उपस्थित होते.कोरोना काळात गावातील जलसंधारण व सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागावा व नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेच्यादृष्टीने गावात जास्तीत जास्त शोषखड्डे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
ठेवण्यात आले असून त्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत.नागरीकांचाही या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे सरपंच घारे व आप्पा परब यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..