चिंदर ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा !

चिंदर ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा !

मसुरे /-

चिंदर ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. चिंदर ग्रामपंचायत हाँल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सरपंच सौ.राजश्री कोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवध्वजाचे विधीवत पुजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, पोलीस पाटील दिनेश पाताडे,ग्रामसेवक पी.जी.कदम, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, विवेक(राजु)परब, गोपाळ लब्दे, अमृत साटम, प्रकाश मेस्री, देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, सिध्देश नाटेकर, विश्राम माळगांवकर, आबा पवार, रणजित बाबू पालकर हे मान्यवर उपस्थिती होते.

अभिप्राय द्या..