दोडामार्ग तालुक्यातील घोटगे येथे कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद..

दोडामार्ग तालुक्यातील घोटगे येथे कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद..

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.त्यानुसार सिंधुदुर्ग जि.प शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज घोटगे येथे लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
४५ वर्षावरील व्यक्तीना जास्त प्रवास करावा लागू नये.प्राथमिक आरोग्य केंद्र वरील लसीकरणासाठी असलेली गर्दी कमी करणे.गाव पातळीवरच लोकांना लसीकरण उपलब्ध करून देणे याकरिता घोटगे येथे लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे डॉ.अनिषा दळवी यांनी सांगितले.
घोटगे गावात लसीकरणाचे महत्त्वाचे काम मार्गी लावणाऱ्या सर्व आरोग्य,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे डॉ.अनिषा दळवी,भाजपा तालुकाअध्यक्ष प्रविण गवस यांनी अभिनंदन केले आहे. तर गावातील अधिकाधिक ग्रामस्थांना लसीकरणाचा लाभ मिळावा यासाठी पत्रकार सुमित दळवी माजी उपसरपंच संदीप दळवी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन सुतार विजय दळवी विकास दळवी संदीप नाईक आदीनी प्रयत्न केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी साटेली भेडशी वैद्यकीय अधिकारी श्री.बी.डी.राणे,छाया धरणे मॅडम,आरोग्य सेविका ठाकर मॅडम,साक्षी दळवी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

अभिप्राय द्या..