सिंधुदुर्गजिल्ह्यात कोरोनामुळे रोज बळी जातात त्यांची चिंता पालकमंत्र्यांना नाही.;ऍड बंड्या माडकुलकर

सिंधुदुर्गजिल्ह्यात कोरोनामुळे रोज बळी जातात त्यांची चिंता पालकमंत्र्यांना नाही.;ऍड बंड्या माडकुलकर

कुडाळ /-

सद्या महाराष्टात शिवसेनेची सत्ता आहे आणी शिवसेना कायम म्हणते कोकण म्हणजे सेना आता कुठे राहिली सेना आणी शासन कोकणच्या जीवावर राज्य करणाऱ्या हया लोक प्रतिधिनी यांना हे कसं लक्षात येत नाही कि ज्यांच्या जीवावर आम्ही मते मागतलीत त्या जनतेची मतदारांची तरी काळजी लाज बाळगा नाही तर सिधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला कोणी मतदान करायला शिल्लक राहणार नाही.आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे रोज बळी जातात त्यांची चिता पालकमंत्र्यांना नाही अशी टीका आज बुधवारी कुडाळ येथे ऍड बंड्या माडकुळकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.पुढे माडकुळकर म्हणाले की ,आतापर्यंत 22 कोटी झाले पण त्याचा हिशोब कुठे आहे हेही सांगावे पालकमंत्री यांनी त्यामध्ये प्रसाशन आहेच मदतीला फक्त मेलेल्यांच्या टाळू वरच लोणी पिण्याऱ्या शासनाकडून कोणती अपेक्षा करायची मुबंई महानगरपालिकेत यांची सत्ता आहे ना तिथे चांगली उपाय योजना करून रुग्ण संख्या कमी केली मग आमच्या जिल्ह्याने काय घोड मारलाय… बघा अजूनही वेळ गेली नाही आहे आम्हाला वाऱ्यावर सोडू नका नाहीतर पुढील वेळी जनता तुम्हाला घरचा रस्ता दाखवेल ऍम्ब्युल्लन्स खरेदी करण्या पेक्षा रुग्नाची काळजी घेऊन त्यांना योग्य उपाय योजना करेल तर सर्वं काही ठीक होईल मुबंईकर प्रत्येक वेळी गावची काळजी करतात पण आता वेळ आल्यावर कोण कोणाचा नसतो हेच दिसतं अशी घणाघाती टीका कुडाळ मधील प्रसिद्ध वकील ऍड.विवेक उर्फ बंड्या माडकुळकर यांनी कुडाळ येथे केली आहे.

अभिप्राय द्या..