कुडाळ /-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कार्यकालाची आज ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोना महामारी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात “तोक्ते” चक्रीवादळाने जो सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला, त्या पिडीत लोकांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज प्रामुख्याने वाफ घेण्याचे मशीन देण्यात आले. साधारण २०० मशीनींचे वाटप आजच्या शुभदिनी करण्यात आले. अनेक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झालेल्या लोकांना घरासाठी सिमेंट पत्रे, ताडपत्री, गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात येत आहे. त्यानिमित्त कुडाळ तालुक्यातून या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ करत सेवा-सप्ताह साजरा केला जाणार आहे. पुढील सात दिवस विविध लोकोपयोगी सेवाकार्ये हाती घेऊन कुडाळ तालुक्यात गावागावात सेवा-सप्ताह साजरा करण्यात येत आहे. आज नेरूर, वालावल, वाडीवरवडे, हुमरमळा, तेर्सेबांबर्डे, पिंगुळी, गोवेरी, पाट, आंदुर्ले, तेंडोली या गावांमध्ये मदतीचे वाटप करण्यात आले अशी माहिती भाजपा नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे गटनेते श्री.रणजित देसाई यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद गटनेते तथा भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष श्री रणजीत देसाई,कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, जिल्हा चिटणीस संजय वेंगुर्लेकर, युवा मोर्चा कुडाळ तालुका अध्यक्ष रुपेश कानडे,अजय आकेरकर, तेंडोली सरपंच भाऊ पोतकर, वाडीवरवडे सरपंच अमेय धुरी, सतीश माडये, शेखर पिंगुळकर, मंगेश चव्हाण, ओबीसी तालुका अध्यक्ष राजन पांचाळ, तन्मय वालावकर, शेखर परब, मयूर पिंगुळकर, गोविंद पाटकर,चंद्रकांत मुडये आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते