मुंबई /-

मुख्यमंत्री हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधणार आहेत. रात्री साडेआठ वाजता ते जनतेला संबोधित करणार असून ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली असल्याचं चित्र आहे.मुंबईसह अनेक शहरांत कोरोनाची संख्या नियंत्रणात येत आहे. मात्र, काही जिल्ह्यात अजूनही रुग्णांची संख्या जैसे थे आहे. राज्यातील एकूण १८ जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. त्यामुळं राज्यातील टप्प्याटप्प्याने उठवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळं या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काही निर्णय घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

लसीच्या तुटवड्यामुळं राज्यातील लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. तसंच, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी राज्यात बालरोगतज्ज्ञांचा टास्कफोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आज मुख्यमंत्री कोणती घोषणा करणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलं आहे. संभाजीराजे भोसले यांनी आरक्षणप्रश्न मार्गी लावला नाही तर ६ जूनपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसंच, इतर राजकीय पक्षांनीही मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरला आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण पेटलं असताना त्या अनुषंगाने मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page