कुडाळ /-

कोरोना काळात बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेउन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी मार्फत संस्थेतच सेवाभावी तत्वावर मोफत कोविड केअर सेंटर संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी सुरु केले त्यांच्या सामाजिक कार्यात आपण ही मदत करावी तसेच या सेंटर येथे २८ कोवीड पेशंट संस्थेच्या अधिपरिचारिका व इतर कार्यरत स्टाफ दिवस रात्र रुग्णाची सेवा करीत आहेत जवळपास ४० ते ५० जणासाठी रोज नाश्ता जेवण या कोविड केअर सेंटर मध्ये दिले जाते. गेले महिनाभर हे कोविड सेंटर उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शवत सुरु आहे. रोजच्या जेवणाची गरज ओळखून महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक समिती कुडाळ च्या वतीने या कोविड केअर सेंटर ला अलिकडेच तांदूळ ,साखर चहापावडर, मसाला, आटा, कडधान्ये यांचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर उपस्थित होते त्यांनी समिती च्या समाजपयोगी उपक्रमांचे कौतूक केले तसेच धन्यवाद दिले.

यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग, सरचिटणीस महेश कुंभार, समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर , सहसचिव नामदेव जांभवडेकर, शिक्षक नेते नंदकुमार राणे, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, केंद्रप्रमुख उदय शिरोडकर, ज्येष्ठ नेते अनंत गावकर, तालुका कार्याध्यक्ष आनंद नवार, माजी तालुका सचिव स्वामी सावंत, मंगेश तेंडोलकर, विकास वालावलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page