दोडामार्ग मध्ये कोरोना काळात देखील गावो-गावी दारू मटका मात्र जोमात सुरूच….

दोडामार्ग मध्ये कोरोना काळात देखील गावो-गावी दारू मटका मात्र जोमात सुरूच….

नक्की लॉकडाऊन कुणासाठी या प्रश्ना समोर मात्र प्रश्नचिन्ह ?

दोडामार्ग /-

कोरोनाने मांडलेला वाढता थैमान पाहता शासनाने अनेक कडक निर्बंध लादत लॉकडाऊन केले असून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन नक्की होत आहे की नाही हे बगणे देखील तेवढेच गरजेचे आहे, लॉकडाऊन काळात शासनाने कडक निर्बंध लादल्याने इतर व्यवसाय मात्र ठप्प होताना दिसत आहेत त्यातच या उलट अवैधरित्या चालू असलेले व्यवसाय मात्र जोमात सुरू असलेले दिसत असून आता तर दारू मटका हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून या अवैध धंद्यांचे जाळे दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येक गावात पसरले आहे,
लॉकडाऊन काळात अनेक तरुण बेरोजगार असुन प्रत्येक गावात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून वाढत्या बेरोजगारी मुळे तालुक्यातील अनेक गावातील तरुण मात्र दारू ,मटका या सारख्या अवैध धंद्यांकडे वळले असून प्रत्येक गावात मटका घेतला जातो तसेच दारू विक्री देखील मोठ्या प्रमाणात केली जाते यावर वेळीच आळा घालणे आवश्यक आहे अन्यथा भावी तरुण पीडीचे भविष्य मात्र धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
मात्र यावर शासनाचा कोणताही प्रकारचा धाक या राजरोसपणे सुरू असलेल्या अवैद्य धंद्यांवर नसल्याने हे धंदे जोमात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

अभिप्राय द्या..