कुडाळ /-
ठाकर आदिवासी कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी( संस्थापक अध्यक्ष पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या) या संस्थेने दिनांक 29 मे 2021 रोजी बॅ नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कोविड केअर सेंटर कुडाळ येथे कोरोना उपचार घेत असलेल्या पेशंटना, १० पाण्याचे बॉक्स, पाच ट्रे अंडी व केळी चे बॉक्स देण्यात आले. संस्थेचे विश्वस्त श्री.चेतन गंगावणे यांची मुलगी कु.नव्या हिच्या वाढदिवसा निमित्त हे देण्यात आले. यावेळीं श्री.उमेश गाळवणकर (चेअरमन,बॅ नाथ पै शिक्षण संस्था ), श्री।एकनाथ गंगावणे, श्री।चेतन गंगावणे, श्री. अरुण मर्गज, श्री। प्रवीण गंगावणे इतर उपस्थित होते.संस्थेच्यावतीने नव्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.