सध्यस्थितीत ५ हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरू…
सिंधुदुर्गनगरी /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३६१ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १७ हजार ४८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.तर ५ हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.