चीनची लस बेअसर; संयुक्त अरब अमिरातीमध्ये आता नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी

चीनची लस बेअसर; संयुक्त अरब अमिरातीमध्ये आता नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी

नवी दिल्ली /-


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनसह अनेक देशांनी लसीचं उत्पादन केलं. चीननं कोरोनाचा सामना करण्यासाठी सायनोफार्म नावाची लस तयार केली. ब्लूमबर्गनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीनं चीनकडून या लसी घेऊन देशात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. परंतु या लसीचे दोन डोस दिल्यानंतरही ज्यांनी ही लस घेतली त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयारच झाल्या नाहीत. अशा परिस्थितीच संयुक्त अरब अमिरातीमध्ये तिसरा डोस देण्याची तयारी केली जात आहे. द नॅशनल न्यूज पेपरमध्ये मार्च महिन्यात प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार काही अशा लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात आला ज्यांच्यामध्ये दोन डोसनंतरही अँटीबॉडीजच तयार झाल्या नाहीत. त्यामुळे आता चीनच्या लसीच्या क्षमतेवरही आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

अभिप्राय द्या..