नवी दिल्ली /-
नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे चर्चेत असलेल्या व्हॉट्स ऍपला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवे धोरण मागे घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आल्या आहेत. नव्या धोरणावरून दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि व्हॉट्स ऍपकडे उत्तर मागितलं होतं. व्हॉट्स ऍपनं नवं धोरण मागे घ्यावं अशा सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिल्याचं वृत्त न्यूज १८ इंडियानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
त्यामुळे आता २५ मे पर्यंत व्हॉट्स ऍपला सरकारकडे त्यांची बाजू मांडावी लागणार आहे आणि व्हॉट्स ऍपनं उत्तर न दिल्यास आम्ही आवश्यक ती पावलं उचलू, असे सरकारकडून पत्रांद्वारे कळविण्यात आले आहे. १५ मेपासून व्हॉट्स ऍपची नवी प्रायव्हसी पॉलिसी लागू झाली आहे.