जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली केळुस कालवीबंदर समुद्रकिनारी भेट..

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली केळुस कालवीबंदर समुद्रकिनारी भेट..

वेंगुर्ला /-


अरबी समुद्रात तयार झालेले तॉक्ते चक्रीवादळ केरळ किनारपट्टीवर धडकून कोकण किनारपट्टीच्या दिशेने सरकत असल्याने केळूस कालवीबंदर किनारपट्टीची पाहणी करण्यासाठी व मच्छिमार बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी तसेच समुद्रालगत असलेल्या कुटुंबांना स्थलांतरीत होण्यासंदर्भात सुचना देण्यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज शनिवारी केळूस कालवी येथे भेट देऊन येथील स्थानिक मच्छीमार बांधवांची भेट घेतली. सावध राहण्याच्या तसेच स्थलांतरीत होण्याच्या सुचना दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र
दाभाडे,वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे, गटविकास अधिकारी उमा पाटील, ए. पी.आय.हुलावळे ,पं. स. विस्तार अधिकारी संदेश परब,केळूस उपसरपंच आबा खवणेकर,
केळूस ग्रामसेवक विवेक वजराटकर,केळूस तलाठी सोन्सुरकर, आडेली तलाठी वेतोरकर, सदस्य कमलाकर वेंगुर्लेकर, महेंद्र वराडकर, मच्छीमार सहकारी सोसायटी अध्यक्ष गोविंद केळूसकर, ग्रामपंचायत कर्मचारी मुणनकर व स्थानिक मच्छीमार बांधव,
पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते.तसेच जिल्हाधिकारी यांनी प्रशासनासह निवती मेढा येथेही भेट दिली.

अभिप्राय द्या..