वेंगुर्ले तालुक्यात १२४८ व्यक्ती कोव्हिड मधून बरे..

वेंगुर्ले तालुक्यात १२४८ व्यक्ती कोव्हिड मधून बरे..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यात आज शनिवारी १५ मे पर्यंत १२४८ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) तून बऱ्या झाल्या आहेत.कोरोना परिस्थिती उद्भवल्यापासून तालुक्यात आतापर्यंत १७५४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या असून एकूण ४५९ व्यक्ती सक्रिय आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.काल शुक्रवारी व आज शनिवारीच्या आलेल्या अहवालात रेडी ७,शिरोडा १,सोनसुरे ६,मठ ८,आडेली ३,निवती १,म्हापण ६,कोचरे २,केळूस १,चिपी ५,गवाण ४,परबवाडा १,अणसुर १,उभादांडा ३,मातोंड १,होडावडा ३,तुळस ३ आणि वेंगुर्ले शहर एरियात १२ व्यक्ती अशा एकूण ६८ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

अभिप्राय द्या..