वेंगुर्ले तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसान..

वेंगुर्ले तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसान..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यात शुक्रवारी पहाटे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात तालुक्यात ठिकठिकाणी नुकसानी झाली आहे.तालुक्यात १८ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वेंगुर्ले हकिम हर्सरी येथे झाडांच्या फांद्या विद्युत लाईनवर पडल्याने विद्युत तारा तुटल्या होत्या.मठ टाकयेवाडी येथील सुनिता यशवंत सावंत यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.वेंगुर्ले शहर येथील पुरुषोत्तम महेश मडकईकर यांच्या घरावर आंब्याची फांदी पडून नुकसान झाले,यामध्ये फोटोग्राफर संदेश राऊळ यांच्या स्टुडिओचे नुकसान झाले.विजेच्या धक्क्याने रावदस येथील रमेश बाळकृष्ण आमडोसकर यांचा विद्युत मीटर व टीव्हीचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

अभिप्राय द्या..