जागतिक परिचारिका दिनानिमित्त कुडाळ मनसेने केला परिचारिकांचा सन्मान..

जागतिक परिचारिका दिनानिमित्त कुडाळ मनसेने केला परिचारिकांचा सन्मान..

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था,सिंधुदुर्ग संचालित कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथील नर्सेसचा पुष्पगुच्छ व लिक्विड वेपरायझर भेट देऊन व्यक्त केली कृतज्ञता…

कुडाळ /-

कोविड 19 च्या कार्यकाळात संस्थेमार्फत केलेल्या उपक्रमाचे मनसेने केले कौतुक

आज दिनांक 12 मे 2019 रोजी जागतिक परिचारिका दिनाचे निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुडाळ तालुक्याच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित कॉलेज ऑफ फिजीओथेरपी कुडाळ येथील परिचारिकांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा सन्मान केला तसेच covid-19 महामारीच्या काळात त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी covid-19 प्रतिबंधात्मक वाफ घेण्यासाठी लिक्विड वेफर लायझर मशीन्स परिचारिकांना भेट देण्यात आल्या.यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,अणाव सरपंच आपा मांजरेकर,मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या कामकाजाबद्दल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त केल्याने संस्थेचे श्री. मर्गत सर यांनी मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

अभिप्राय द्या..