जागतिक परिचारिका दिनानिमित्त<br>भाजप उद्योग व्यापार आघाडीतर्फे परिचारिकांचा सत्कार..

जागतिक परिचारिका दिनानिमित्त
भाजप उद्योग व्यापार आघाडीतर्फे परिचारिकांचा सत्कार..

मालवण /-
भाजप उद्योग व्यापार आघाडी सिंधुदुर्गच्यावतीने परिचारिका दिनानिमित्त मालवण ग्रामीण रूग्णालयातील परिचारिकांना गणवेश कापड व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना महामारीत गेले वर्षभर परिचारिका अविरत आरोग्य सेवा देत असून त्यांच्या या कार्याची जाण ठेवत त्यांना सन्मानित करण्यात येत असल्याचे यावेळी भाजप उद्योग व व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी स्पष्ट करत परिचारिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, भाजप उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास हडकर, युवानेते बाबा परब, नगरसेविका पूजा सरकारे, राजू बिडये, बबलू राऊत, पंकज पेडणेकर, राहुल कुलकर्णी, उदय चव्हाण, संदेश चव्हाण, कौशल वस्त आदी व इतर उपस्थित होते. यावेळी आपल्या सन्मानाबद्दल परिचारिकांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

अभिप्राय द्या..