सर्व आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरण चालू करा! ; भाजप तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची मागणी..

सर्व आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरण चालू करा! ; भाजप तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची मागणी..

मसुरे /-

मालवण तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शासनाने यावर अतिजलद उपाय योजना करणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात लसीकरणास गर्दी होत आहे. वाहतुकीच्या साधना अभावी जेष्ठ ग्रामस्थांना पोचणे अवघड होतं आहे. त्यामुळे आरोग्य उपकेंद्रामध्ये लसीकरण सुविधा चालू करावी अशी मागणी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. तसेच संशयित रुग्णांची जलदगतीने तपासणी होण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट आरोग्य उपकेंद्रात उपलब्ध असणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णवाहिकाना डिझेलची समस्या भेडसावत असून या रुग्णवाहिका डिझेल अभावी उभ्या राहू नयेत यासाठी वेळेवर डिझेल पुरवठा होणे आवश्यक आहे. कोविड काळात गावात कार्यरत असलेल्या ग्राम सनियंत्रण समितीला विमा संरक्षण व सर्व सदस्यांना लसीकरणास प्राधान्य देणे आवश्यक आहे.आशा स्वयंसेवीका व अंगणवाडी सेविका याना कोविड कालावधी साठी अतिरिक्त मानधन मिळावे अशी मागणी सुद्धा भाजप तालुकाध्यक्ष श्री. धोंडी चिंदरकर यांनी केली आहे.

अभिप्राय द्या..