वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यात आज रविवारी आलेल्या अहवालात एकूण ४१ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी १,टाक १,सोनसुरे १,मठ १,उभादांडा २,तुळस ४,मातोंड ४,आरवली सुतारवाडी ६,आरवली ३,शिरोडा ४,आडेली २,वेतोरे पालकरवाडी ३,खानोली २ आणि वेंगुर्ले शहर एरियात ७ अशा एकूण ४१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे.दरम्यान शनिवारी आलेल्या अहवालात एकूण ३४ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात १२,उभादांडा ३,तुळस १,मातोंड २,आडेली ८,मठ १,मोचेमाड १,आरवली १,कोचरा १,परुळे १,केळूस १ व म्हापण २ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.