शिरोडा येथे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा..

शिरोडा येथे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा..

वेंगुर्ला /-
शिरोडा येथे कोरोना आढावा बैठक जिल्हा परिषद
सदस्य प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या
बैठकीला शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, ग्रामसेवक सुनिल चव्हाण, कृतिसमिती मेम्बर कौशिक परब, राहुल गावडे, रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शुक्ला, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.देसाई, डॉ.साळगावकर,आरोग्यसेवक आजगावकर,मठकर, नर्स संध्या रेडकर आदी उपस्थित होते.यावेळी प्रितेश राऊळ यांनी रेडी पीएचसी व शिरोडा उपजिल्हा रुग्णालय मध्ये ४५ ते ६० वयोगटातील किती व्यक्तींचे लसीकरण झाले व किती शिल्लक आहे,याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.तसेच काय समस्या आहेत,ऑक्सिमीटर, थर्मल गन, पीपीई किट आदींची आवश्यकता याबाबत माहिती घेतली.शिरोडा भागातील कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या किती आहे,येथील कंटेंटमेंट झोन याबाबतही त्यांनी माहिती घेतली.तसेच दोन्ही ठिकाणी आवश्यक उपाययोजनांबाबत आढावा घेत काही समस्या – अडचणी असल्यास सुचविण्यात याव्यात,याबाबत येथील जनतेच्या हिताच्या दृष्टीने आपण स्वतः प्रयत्नशील राहून तसेच वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन सहकार्य करण्याचे आश्वासन प्रितेश राऊळ यांनी दिले.

अभिप्राय द्या..