वेंगुर्ला /-


रेडी पोर्ट तर्फे रेडी प्राथमिक (Phc)ला ऑक्सिमीटर,थर्मल गन,हॅन्डग्लोव्ह्ज,ऑक्सिजन स्प्रे,सॅनिटायझर आदी साहित्य देण्यात आले.
तसेच रुग्णाना आवश्यक असणार्‍या व्हिटॅमिन सी च्या गोळ्या व रुग्णाला जर ईमरजन्सी ऑक्सिजन लागल्यास हॅन्ड ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आला आहे.
यावेळी रेडी पोर्ट चे व्हाईस प्रेसिडन्ट शेनॉय,,संदिप चौहान,जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, रेडी प्रा.आ.केंद्राच्या डॉ.शुक्ला, ग्रा.प.सदस्य आनंद भिसे,डॉ.प्रसाद साळगावकर,रेडी पीएचसी सुपरवायझर कलंगुटकर,आरोग्यसेवक गवंडे,गतप्रवर्तक राऊळ, एएनएम नर्स आणि रेडी पीएचसी स्टाफ आदी उपस्थित होते.जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी याबाबत तात्काळ पाठपुरावा करुन आश्वासन दिल्याप्रमाणे
थर्मल गन व ऑक्सिमीटर दिल्याने त्याचा फायदा प्रत्यक्षात रेडी, केरवाडा, शिरोडा, आरवली, मोचेमाड, अणसुर च्या कोविड होम आयसोलेशन केलेल्या रुग्णाना होणार आहे.याबाबत रेडी पोर्ट अधिकारी व जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page