कोवीशिल्डच्या 3 हजार 500 लशी कुडाळमद्धे उपलब्ध..

कोवीशिल्डच्या 3 हजार 500 लशी कुडाळमद्धे उपलब्ध..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यासाठी कोवीशिल्ड लसीचे 3 हजार 500 डोस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बंद केलेली लसीकरण मोहीम आज पासून पुन्हा सुरू होणार आहे.४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटासाठी हे बूस्टर डोस देण्यात येणार आहेत.कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस आज आणि उद्या दिला जाणार आहे. ही लस केवळ बूस्टर डोस किंवा दुसरा डोस देणे करिताच 45 वर्षावरील नागरिकांना दिली जाणार आहे. त्यामुळे १८ ते २४ वयोगटातील नागरिकांना पहिला अथवा दुसरा डोस देता येणार नाही,अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..