कोवीशिल्डच्या १८ हजार लशी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध..

कोवीशिल्डच्या १८ हजार लशी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यासाठी कोवीशिल्ड लसीचे १८ हजार डोस काल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बंद केलेली लसीकरण मोहीम आज पासून पुन्हा सुरू होणार आहे
४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटासाठी हे बूस्टर डोस देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण ३६ लसीकरण सत्राद्वारे प्रतिदिन २५० प्रमाणे कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस आज आणि उद्या दिला जाणार आहे. ही लस केवळ बूस्टर डोस किंवा दुसरा डोस देणे करिताच 45 वर्षावरील नागरिकांना दिली जाणार आहे. त्यामुळे १८ ते २४ वयोगटातील नागरिकांना पहिला अथवा दुसरा डोस देता येणार नाही त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..