सिंधुदुर्गनगरी /-
सहकारी कंत्राटी महीला कर्मचारीकेचा विनयभंग केल्याचा ठपका ठेवून जिल्ह्याचे तत्कालीन शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांना आज निलंबित करण्यात आले. ही कारवाई आज करण्यात आली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ते अनेक दिवस फरार होते. त्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर शरणागती पत्करली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ जावून आपला कार्यभार स्वीकारला होता.