सावंतवाडी-कॅथाँलिक अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल.;पी. एफ. डान्टस यांची माहिती..

सावंतवाडी-कॅथाँलिक अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल.;पी. एफ. डान्टस यांची माहिती..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन..

सावंतवाडी /-

सावंतवाडी येथील कॅथॉलिक अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसा. लि. या पतसंस्थेची कार्यालयीन वेळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आली आहे.दरम्यान उद्यापासून ३० एप्रिल पर्यंत ही संस्था सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत सुरू राहणार आहे. तर शनिवार-रविवार कामकाज पूर्णतः बंद राहील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. एफ. डान्टस यांनी दिली. दरम्यान सर्व ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३० एप्रिल पर्यत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पतसंस्थांची वेळ दुपारी २:०० पर्यंत करण्याचे आदेश राज्य तसेच जिल्हा फेडरेशनने दिले आहेत. त्यानुसार शासनाला सहकार्य करण्यासाठी आपल्या पतसंस्थेची कार्यालयिन वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे श्री. डान्टस यांनी म्हटले आहे.

अभिप्राय द्या..