सिंधुदुर्ग/-

कोरोनाची लस आता जिल्ह्यातील खासगी रुंगणालयात उपलब्ध होणार असून जिल्हा परिषदेचे ‘कार्यक्षम’ आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांच्या हस्ते काल कणकवलीत अगदी घाईघाईत एका खासगी रुंगणालयात त्याचा शुभारंभही झाला हे विशेष होय.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ज्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत लोकनियुक्त प्रतिनिधींचा कारभार चालतो त्या जि. प.चे पदाधिकारी,सदस्य यांना मात्र या सगळ्या उपक्रमाचा थांगपत्ताच नाही.काहीनी याबाबत अनभिज्ञता व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या.तर काहींना स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांवरुन समजले.
सर्वात गमतीचा भाग म्हणजे एका स्थानिक दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार जिल्ह्यातील सात खासगी दवाखान्यांमध्ये बुधवार दि.३ मार्च पासून कोरोना लस देण्यास सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी मंगळवारी २मार्च रोजी दिल्याचे म्हटले आहे.तर याच दैनिकात ‘खासगी रुंगणालयात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ’ अशी बातमी आहे.आणि कणकवली येथील एका खाजगी दवाखान्यात लसीकरण कक्षाचे फीत कापून उदघाटन त्यांच्याच हस्ते झाल्याचा फोटो आहे.फीत नेमकी कोणी कापली यापेक्षा हे सगळे इतक्या घाईने आणि तेही लोकप्रतिनिधीना अंधारात ठेवून कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो.
खरं तर जिल्ह्यातील जे सात खाजगी दवाखाने निवडण्यात आले त्या सर्व ठिकाणी सर्व पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरु करायला हवा होता.पण जिल्हा परिषदेत लोकनियुक्त प्रतिनिधींचा कारभार चालतो याचा आरोग्य विभागाला वीसर पडला असावा.लोकप्रतिनिधीनाही आपले अधिकार काय याची जाणीव होत नाही त्यामुळेच त्यांचा हेतुपुरस्सर अपमान करण्याचे धाडस अधिकारी करतात.
ज्याना २५० रुपये देऊन लस घेणे शाक्य आहे,आणि अशा जास्तीत जास्त लोकांनी ती घ्यावी म्हणून शासनमान्य खासगी दवाखान्यात हा उपक्रम शासनाने सुरु केला.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जनजागृती गरजेची आहे आणि ती सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीच करू शकतात.मात्र त्यांना डावलून,अंधारात ठेवून हा उपक्रम यशस्वी होईल हा आरोग्य विभागाचा भ्रम आहे.
खरं तर लोकप्रतिनिधीना डावलून कारभार हाकला की काय होते हे जि. प.च्या मागील ‘सीईओ’ च्या तड़काफड़की बदलीवरुन लक्षात यायला हवे.सर्वच अधिकारी ,कर्मचारी यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.आपण जनतेचे सेवक आहोत याचा का कोण जाणो विसर पडतो आणि मग लोकप्रतिनिधी-प्रशासन असा संघर्ष होतो त्यात आम जनतेचे नुकसान होते.विकासाला खीळ बसते.
गेल्या वर्षभरात ‘कोरोना’ संकटात कोणी, किती काम केले हे सिंधुदुर्गवासी जाणतात.एखाद्या दवाखान्याचे यश हे तिथे येणाऱ्या रुंगणांच्या संख्येवरुन आजमावता येते.जि.प.चा आरोग्य विभाग आणि शासनाची आरोग्य यंत्रणा यांच्यात गेल्या वर्ष भरात समनव्यच नव्हता.कोण ,किती प्रत्यक्ष ‘फिल्ड’ वर काम करत होते हे वेगळे सांगयाची गरज नाही.एक टया जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी संपूर्ण जिल्हाभर,गावांना ,रुंगणालयांना भेटी देत फिरत होत्या.शिवाय पोलीस यंत्रणा,जिल्हा रुंगणालयाची यंत्रणा अहोरात्र झटत होती.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची ग्रामीण,दुर्गम भागातील यंत्रणा,आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका या सर्वांचे योगदान ‘केबिन’ मध्ये बसून आदेश देणाऱ्या ,बैठका घेणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा खूपच मोठे आहे.खरं तर ‘कोरोना’ संकटावर मात करण्यात आपण यशस्वी झालो त्याबद्दल ‘योद्धा’ म्हणून जिल्हावासीयानी या सर्वांचे आभार मानले पाहिजेत.त्यांचा सत्कार केला पाहिजे.
जिल्ह्यातील काही खासगी दवाखाने,डॉक्टर्स मंडळी यापैकी ‘ कोरोना’ संकट काळात कोणी,किती योगदान दिले याची माहिती सऱ्या जिल्हावासियाना आहे.त्यावर अधिक काही लिहावे असे वाटत नाही
जिल्ह्यात कोरोना आजार ,लसीकरण व उपाययोजना यासाठी जनजागृती महाअभियान राबविण्यात येणार आहे.त्यासाठी एक रथ आजपासून पुढील दहा दिवस जिल्ह्यात शंभर ठिकाणी फिरणार आहे.त्याला मात्र लोकप्रतिनिधीनी उपस्थित रहावे अशी अपेक्षा आरोग्य विभागाची असणार आणि ते साहजिकही आहे.कारण त्या ‘रथा ‘बरोबर फिरणार कोण .? अधिकारी फिरणार का..? लोकप्रतिनिधींच्या सहभागाशिवाय जनजागृती होऊच शकत नही हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page