मुणगे सडा येथे लागलेल्या आगीत फळबागांचे नुकसान!

मुणगे सडा येथे लागलेल्या आगीत फळबागांचे नुकसान!

मसुरे /-

देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी आणि लब्देवाडी सड्यावर गवळदेव देवस्थान नजीक मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास लागलेल्या आगीत ग्रामस्थांच्या काजू, आंबा झाडांसह गुरांच्या वैरणीचे नुकसान झाले आहे. लब्देवाडी येथील
श्री.गणपत रुपें यांच्या भाताच्या रचून ठेवलेल्या उडव्याला आग लागुन ते पूर्णपणे जळाले. आगीची घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. खाजगी वाहनांनी ग्रामस्थानी पाणी आणून गवताच्या उडव्याची आग विझवल्याने लगतचा शेत मांगर आगीत जळण्या पासून वाचला.
विजय रुपे,मंगेश हाटले, संतोष नाटेकर,प्रकाश लब्दे, साहिल लब्दे, संदेश लब्दे, दिपक राणे गुरुनाथ रुपे,संकेत रुपे ,सुरेश रुपे,जयवंत सावंत,संजय लब्दे, राजु बोरकर,दिपक राणे,बबन रासम,एकनाथ सुर्वे, सोमनाथ रुपे, योगेश लब्दे,सागर माधव,ओमकार माळकर,गणपत रुपे,आत्माराम रासम,किरण रासम,अशोक रुपे आदी ग्रामस्थानी मदत केली. विद्युत भारित तारांमधून ठिणगी पडल्याने सुके गवत पेटून आग लागल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

अभिप्राय द्या..