आचरा /-
ग्राहकाला काय हवे याची माहिती घेऊन शेतमाल उत्पादकाने पीक पद्धती कृषी प्रक्रिया, पुरवठ्याची साखळी व विक्री व्यवस्था विकसित केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावू शकतो असे मत मालवण तालुका कृषी अधिकारी व्हि जी गोसावी यांनी चिंदर सडेवाडी येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या वतीने विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ चिंदर सडेवाडी येथील प्रगतशील शेतकरी अश्र्विनी कुमार कांबळी यांच्या शेतमाल विक्री केंद्रावर सरपंच राजश्री कोदे यांच्या हस्ते केला गेला यावेळी ते बोलत होते या वेळी त्यांच्या सोबत उपसरपंच दिपक सुर्वे, आचरा कृषी पर्यवेक्षक अजित गवंडे चिंदर कृषी सहाय्यक सुनिल कदम, एस डी शिंदे ,एस जी परब, मिथुन खराडे,आत्मा तालुका कृषी व्यवस्थापक निलेश गोसावी,कृषी मित्र सुनिल धुमडे,सुशांत आसोलकर,सुनिल पवार, अश्विनीकुमार कांबळी, अंकिता कांबळी, सानिका धुमडे,विवेक कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.